Ad will apear here
Next
मनसेच्या आस्थापना विभाग जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर
जगदीश वाल्हेकर यांच्या निवडीचे पत्र देत स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर. या वेळी उपस्थित उपाध्यक्ष रावसाहेब कदम व सरचिटणीस योगेश चिले.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या जिल्हाध्यक्ष तथा संघटकपदी जगदीश मारुती वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रस्ते आस्थापना विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर यांनी वाल्हेकर यांच्या निवडीचे पत्र दिले. या वेळी उपाध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस योगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते. 

रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना चांगल्या प्रतीच्या होण्यासाठी मनसेचा हा विभाग सक्रियपणे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हास्तरीय नेमणूक केल्या आहेत. 

‘खड्डे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला जाब विचारून असुविधांची कोंडी फोडण्यासाठी हा विभाग उपयुक्त ठरेल’, असे मत परुळेकर यांनी व्यक्त केले. 

जगदीश वाल्हेकर
‘पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करून दबावगट तयार केला जाईल व अहवाल सादर करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल’, असे  जगदीश वाल्हेकर यांनी सांगितले. 

या वेळी जिल्हा उपसंघटकपदी अनिल वरघडे व गणेश शेळके यांची जुन्नर तालुका संघटकपदी दत्तात्रय खंडागळे यांची, तर मावळ तालुका संघटकपदी संदीप पोटफोडे यांची निवड करण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZPGBT
Similar Posts
मनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने १९ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा रखडलेला निकाल जाहीर करण्याची मागणी पुणे : मे महिन्यात घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग द्वितीय वर्षाचा निकाल विद्यापीठाकडून रखडला आहे. त्यामुळे सेमिस्टर परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून, विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. द्वितीय वर्षाची फेरपरीक्षा मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पार पडली. हे निकाल नियमानुसार ४५ दिवसात
नियुक्तीचे आदेशपत्र देण्याचे लेखी आश्वासन पुणे : जिल्हा परिषदेअंतर्गत गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक सेवा नियुक्त्यांची गुरुवारी कागद पडताळणी होऊनही त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले नव्हते. याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘ ठिय्या बैठो’ आंदोलन केले व याची दाखल घेऊन अवघ्या दोन तासांतच जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी दराडे यांनी सर्व
... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल पुणे : ‘ग्रामीण-शहरी गरजांची सांगड घातली गेली, कल्पकेने पर्यटकांपर्यंत पोहोचले, तर निसर्ग, शेती, मोकळ्या हवेची ओढ पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे खेचून आणेल,’ असा सूर दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेत उमटला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language